22 October 2020

News Flash

दिल्ली जिंकण्यासाठी अमित शाह रात्री दोन-दोन वाजेपर्यंत घेतायत बैठका

अमित शाह न थकता दिल्लीमध्ये मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता भाजपाच्या अध्यक्षपदी नसले तरी, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष आहे. दिल्ली जिंकण्यासाठी अमित शाह पूर्ण जोमाने प्रचार करत आहेत. अमित शाह रोड शो शिवाय दिवसाला तीन ते चार सभा संबोधित करत आहेत. मतदारसंघनिहाय पदाधिकारी, समन्वयक यांच्या रात्री दोन वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात बैठका घेत आहेत.

प्रचार कसा सुरु आहे, जनमताचा कौल कुठल्या दिशेला आहे ते जाणून घेत आहेत. पहिल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य दैनंदिन कामकाजांमध्ये व्यस्त झाले असून, अमित शाह यांनी दिल्लीच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. शेवटच्या टप्प्यात मोदी प्रचारात उतरणार की, नाहीत ते लवकरच दिसेल.

अमित शाहंमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह
अमित शाह यांनी दिल्ली निवडणुकीत लक्ष घातल्यामुळे भाजपाच्या प्रचारामध्ये जान आली असून, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. अमित शाह न थकता दिल्लीमध्ये मतदारसंघनिहाय बैठका घेत आहेत. पक्षाकडून काय टि्वटस केले जातायत त्यावर सुद्धा शाह यांचे लक्ष आहे. दोन फेब्रुवारीला बुरारीमध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत जनसभेला संबोधित करणार आहेत.

दैनंदिन सरकारी कामकाज संपवल्यानंतर अमित शाह निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त होतात. दर दिवशी रोड शो आणि तीन ते चार सभांना ते संबोधित करतात. रणनिती ठरवण्यासाठी रात्री उशिरा सुरु होणाऱ्या पक्षाच्या बैठका मध्यरात्रीपर्यंत चालतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2020 4:15 pm

Web Title: delhi assembly elections 2020 amit shah meetings with constituency coordinators dmp 82
Next Stories
1 स्मार्टफोन, टीव्ही, वॉशिंग मशीन महागण्याची शक्यता; बजेट नव्हे ‘हे’ आहे कारण!
2 चौथीच्या मुलांनी CAA विरोधात नाटक सादर केल्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल
3 CAA: दिल्लीतील जामिया परिसरात गोळीबार करणारा तरुण ताब्यात
Just Now!
X