News Flash

अरविंद केजरीवाल विरोधकांना उद्देशून म्हटले, हम होंगे कामयाब?

अरविंद केजरीवाल यांनी हे गाणे आपल्या विरोधकांना उद्देशून म्हटल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

अरविंद केजरीवाल

आज देशभरात भारताचा स्वातंत्र्य दिवस उत्सव अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरा होतो आहे. दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झेंडा वंदन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी दिल्लीतले अधिकारीही उपस्थित होते. झेंडा वंदन झाल्यावर अरविंद केजरीवाल यांनी हम होंगे कामयाब एक दिन या गाण्याच्या ओळी म्हटल्या. अरविंद केजरीवाल हे गाणे म्हटल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. केजरीवाल विरोधकांना उद्देशूनच हे गाणे म्हटले असावेत अशीही शक्यता वर्तवण्यात येते आहे.

तसेच अरविंद केजरीवाल यांनी मजहब नहीं सिखाता आपसमें बैर रखना, हिंदी है हम वतन है, हिंदोस्ता हमारा या गाण्याच्या ओळीही ट्विट केल्या. एएनआय या वृत्त संस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. अरविंद केजरीवाल यांनी जे गाणे म्हटले त्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे.

पाहा व्हिडिओ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 1:59 pm

Web Title: delhi cm arvind kejriwal sings hum honge kamyab at the independence function at delhis chhatrasal stadium
Next Stories
1 केरळमध्ये पावसाचं थैमान! शनिवारपर्यंत कोची विमानतळ बंद, ४५ जणांचा मृत्यू
2 मोदी सत्तेतून गेल्याशिवाय ‘सच्चे दिन’ येणार नाही: काँग्रेस
3 जिओ गिगा फायबरच्या नोंदणीला सुरूवात
Just Now!
X