दिल्लीत विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. प्रचारसभांपासून ते सोशल नेटवर्किंगपर्यंत सर्वच प्रकारे मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष आणि उमेदवार करत आहेत. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि भाजपाची मुख्य लढत रंगणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. मंगळवारी भाजपाने सध्या व्हायरल झालेल्या ‘आर्ट व्हेर्सेस आर्टीस्ट’ ट्रेण्डचा आधार घेत आपवर टीका केली आहे. मात्र यावरुन आप समर्थकांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

काय आहे हा ट्रेण्ड?

मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर ‘आर्ट व्हेर्सेस आर्टीस्ट’ हा ट्रेण्ड व्हायरल झाला आहे. यामध्ये पहिला फोटो एखाद्या गोष्टीचा असतो आणि दुसरा ती गोष्ट घडवून आणणाऱ्या व्यक्तीचा. उदा: षटकार ही कला असेल तर रोहित शर्मा हा कलाकार आहे. अशाप्रकारचे अनेक मिम्स मागील काही दिवसांपासून ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत.

भाजपाने काय पोस्ट केलं?

भाजपा दिल्लीच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये एकाकडे जळणारी बस दाखवण्यात आली आहे तर दुसरीकडे अरविंद केजरीवाल यांचा फोटो दाखवला आहे. “जाळपोळ कला असेल तर केजरीवाल कलाकार आहेत,” असा टोला भाजपाने यामधून लगावला आहे.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये सुधारित नागरिक्त कायद्यासाठी मोदींचे कौतुक भाजपाने केले आहे. “सुधारित नागरिकत्व कायदा कला असेल तर मोदी कलाकार आहेत,” असं यामधून भाजपाला सांगायचे आहे.

तिसऱ्या पोस्टमधून दिल्लीतील वाहतूककोंडीसाठी केजरीवाल जबाबदार असल्याचा आरोप भाजपानं केलं आहे. “वाहतूककोंडी कला असेल तर केजरीवाल कलाकार आहेत,” असा टोला भाजपाने लावला आहे.

तर चौथ्या पोस्टमध्ये मोदी सरकारचे कौतुक करताना रस्तेबांधणी ही कला असेल तर मोदी कलाकार आहेत असं म्हटलं आहे.

दिल्ली भाजपाने हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी या मिम्सला त्याच पद्धतीने उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थव्यवस्था, वाढती महागाई, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, निर्मला सितारामन अशा अनेक गोष्टींवरुन आप समर्थकांनी भाजपाला लक्ष्य केलं आहे.

 

१)

२)

३)

४)

५)

६)

७)

८)

९)

१०)

 

११)

१२)

दिल्लीमध्ये ८ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. दिल्लीमध्ये ७० विधानसभा जागा असून गेल्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने ६७ जागा जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीमध्ये आप जागा टिकवण्यासाठी तर भाजपा दिल्लीमध्येही सत्ता स्थापन करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.