25 May 2020

News Flash

केजरीवालांच्या दिल्ली विजयाची न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्टकडून दखल

नरेंद्र मोदी यांच्या भाजपासाठी हा मोठा झटका असल्याचे वर्णन जगातील प्रमुख माध्यमांनी केले आहे.

दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीने विजयाची हॅटट्रीक केली आहे. आपने एकतर्फी विजय मिळवत ७० पैकी तब्बल ६२ जागा जिंकल्या. जगभरातील आघाडीच्या माध्यमांनी आपच्या या विजयाची दखल घेतली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या भाजपासाठी हा मोठा झटका असल्याचे वर्णन जगातील प्रमुख माध्यमांनी केले आहे. ‘प्रचाराचे ध्रुवीकरण केल्यानंतर मोदी यांच्या पक्षाचा दिल्लीत पराभव’ असे हेडींग गार्डीयनने दिले आहे. राज्यातील महत्वाच्या निवडणुकीत भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला मोठया पराभवाचा सामना करावा लागला. मोठया प्रमाणावर ध्रुवीकरण करुनही भाजपाला दिल्लीच्या जनतेची मते मिळाली नाहीत असे गार्डीयनने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

‘दिल्ली निवडणुकीत मोदींच्या पक्षाला झटका’ असे न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या हेडींगमध्ये म्हटले आहे. भाजपाने दिल्ला विधानसभा निवडणुकीला हिंदू बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक असा रंग देण्याचा प्रयत्न केला. पण आम आदमी पार्टीने बाजी मारली. दिल्लीशी संबंधित स्थानिक मुद्दांऐवजी भाजपाने सांप्रदायिकता, नागरीकत्व कायदा आणि हिंदुंशी संबंधित मुद्दांवर भर देण्याची रणनिती आखली होती असे न्यू यॉर्क टाइम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे.

भाजपाच्या पराभवाचे वर्णन करताना द वॉशिंग्टन पोस्टने ‘नवी दिल्ली निवडणुकीत मोदींच्या पक्षाचा धक्कादायक पराभव’ असे हेडींग दिले आहे. मोदींच्या भाजपाचा आप या स्थानिक पक्षाने दारुण पराभव केला. इलेक्ट्रीसिटी, शालेय शिक्षण, गरीबांसाठी धोरणे या मुद्दांभोवती आपचा प्रचार केंद्रीत होता असे वॉशिंग्टन पोस्टने बातमीमध्ये लिहीले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 4:57 pm

Web Title: delhi election results global media reported aaps massive victory against bjp dmp 82
Next Stories
1 देवबंद अतिरेक्यांची गंगोत्री – गिरीराज सिंह
2 काँग्रेसकडे निवडणुकांसाठी चेहराच नाही – कपिल सिब्बल
3 मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला ११ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा
Just Now!
X