राजधानी दिल्लीमध्ये एक अजब प्रकरण समोर आले आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्या ५९ वर्षीय वडिलांविरोधात ३० वर्षीय मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली. एएनआयच्या वृत्तानुसार, मुलाच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलीस त्या व्यक्तीविरोधात न्यायालयीन कारवाई करण्याच्या विचारात आहे. दिल्लीमधील वसंत कुंज परिसरात हा सर्व प्रकरा घडला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत कुंजमधील एका ३० वर्षी तरूणानं वडिलांविरोधात तक्रार दिली होती. वडिल वारंवार लॉकडाउनच्या नियमाचं उल्लघंन करत असल्याचा आरोप मुलानं तक्रारीत केला आहे. या प्रकरणावर सोशल मीडियावर खमंग चर्चा सुरू आहे. काही नेटकऱ्यांनी मुलाला अधुनिक युगाचा श्रावण कुमार म्हटलेय.  देशात करोना व्हायरसचा वाढता प्रदुर्भाव पाहून मोदींनी २१ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. भारतामध्ये २३०० जणांना करोना व्हायरस झाला आहे. ५६ जणांचा या महामारीनं जीव घेतला आहे. केंद्र सरकार आणि राज्या सरकार या महामारीतून वाचण्यासाठी सर्वोतपरीनं प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा- क्वारंटाइन सेंटरमध्ये करण्यात आलं नमाज पठण

चीनमधील वुहान शहरातून उद्भवेला करोनानं जगातील २०४ देशांत आपली पायामुळे रोवली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं करोना व्हायरसला महामारी असे घोषित केलं आहे. या महामारीवर अद्याप कोणतेही औषध अथवा लस उपलबद्ध नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचं वातावरण आहे. जगभरातील देशांनी जारी केलेल्या आकडेवारी आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशनच्याआकड्यांच्या आधारावर worldometers.info नं दिलेल्या माहितीनुसार, करोना व्हायरसनं आतापर्यंत ५३ हजार दोनशे ३८ जणांचा बळी घेतला आहे. तर दहा लाख १६ हजार ४१३ जणांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. तर आतापर्यंत जगभरात दोन लाख १३ हजार ३५ जण कोरानामुक्त झाले आहेत.