26 September 2020

News Flash

फेसबुकवरील मैत्री पडली महागात, अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये सामूहिक बलात्कार

फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाने मुलीशी मैत्री केली होती. गेल्या एक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

फेसबुकवरील मैत्री एका अल्पवयीन मुलीला महागात पडली आहे. आरोपीने मुलीशी सलगी वाढवून तिला दिल्लीतून मेरठला नेले. तिथे एका हॉटेलमध्ये त्याच्याबरोबर काही इतर लोकांनीही मुलीवर बलात्कार केला. दोन दिवस हा प्रकार सुरु होता, असे मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.

फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाने मुलीशी मैत्री केली होती. गेल्या एक वर्षांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते. आरोपी मुलाने तिला लग्नाचे आमिष दाखवले. याचदरम्यान, मागील आठवड्यात मुलीने आरोपीला भेटण्याचा निर्णय घेतला. पीडित मुलीने आई-वडिलांना शिकवणीसाठी जात असल्याचे सांगत घराबाहेर पडली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलीला एका ठिकाणी जायचं असल्याचे सांगत तिला सोबत नेले.

आरोपीने फसवून मेरठला नेले. विरोध केल्यानंतर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली. एका हॉटेलमध्ये पीडित मुलीला बंद करुन ठेवले. दोन दिवस ती त्या हॉटेलमध्ये होती. दोन दिवस आरोपी आणि त्याच्या मित्रांनी पीडित मुलीवर बलात्कार केला.

दोन दिवसानंतर ती तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने दिल्लीत येऊन पोलिसांत तक्रार नोंदवली. पोलिसांनी मुख्य आरोपीला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा कसून तपास केला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2018 4:12 pm

Web Title: delhi minor friend on facebook gang raped in meerut hotel
Next Stories
1 धक्कादायक: स्थलांतरीत मुलांना अमेरिकेची नाझींसारखी वागणूक
2 राफेल वाद: संपूर्ण परिच्छेद कसा चुकू शकतो, मल्लिकार्जुन खर्गेंचा सवाल
3 २०१९च्या निवडणुकीसाठी एनडीएच्या नेतृत्वात बदल होणार नाही : अमित शाह
Just Now!
X