News Flash

मद्यपी पतीची पत्नीने केली हत्या, मृतदेहाचे तुकडे करुन घरातच पुरले

स्वरुप नगर येथे राहणारे राजेश हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली नव्हती.

प्रतिकात्मक छायाचित्र

दिल्लीतील स्वरुप नगर येथील ६० वर्षांच्या वृद्धाची त्याच्या पत्नीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पतीला दारुचे व्यसन होते आणि मद्यपान करुन तो दररोज मारहाण करत असल्याने महिलेने पतीची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून तिला आणखी कोणी मदत केली होती का, याचा पोलीस तपास करत आहेत.

स्वरुप नगर येथे राहणारे राजेश हे गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली नव्हती. राजेश हा मूळचा बिहारचा असून तो पत्नीसह दिल्लीतील स्वरुप नगर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. अमृत विहार कॉलनी येथे त्यांचे घर होते. राजेश हे गेल्या काही दिवसांपासून घरात दिसत नसल्याने घरमालकाला संशय आला. त्याने राजेश यांच्या पत्नीकडे विचारणाही केली, मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. घरातील परिस्थिती पाहून घरमालकाचा संशय बळावला आणि त्याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी घराची झाडाझडती घेतली असता घरात राजेश यांचा मृतदेह पुरल्याचे उघड झाले. राजेश यांच्या मृतदेहाचे तुकडे करुन पुरण्यात आले होते. १३ फेब्रुवारी रोजी तिने पतीची हत्या केली होती.

पोलिसांनी राजेश यांच्या पत्नीची कसून चौकशी केली असता तिने हत्या केल्याची कबुली दिली. राजेश यांना दारुचे व्यसन होते आणि मद्यधूंद अवस्थेत ते दररोज मारहाण करायचे. हा त्रास असह्य झाल्याने त्यांची हत्या केली, असे तिने पोलिसांना सांगितले. राजेश यांची पत्नी ही एका फॅक्टरीत कामाला होती. तिला या हत्येमध्ये आणखी कोणी मदत केली होती का, याचा पोलीस तपास करत आहेत.  राजेश आणि महिलेची ओळख काही वर्षांपूर्वी झाली होती. आठ वर्षांपूर्वी त्यांनी लग्न केले आणि या दाम्पत्याला एक लहान मुलगा देखील आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 21, 2019 2:09 pm

Web Title: delhi woman stabbed husband to death cut up his body buried outside house
Next Stories
1 सामना सुरु असताना २२ वर्षीय क्रिकेटपटूचा मैदानात मृत्यू
2 पुलवामा हल्ल्याची चौकशी केल्यास बड्या नेत्यांची पोलखोल होईल : सपा नेता
3 धक्कादायक ! विकृताचा कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार, घटना सीसीटीव्हीत कैद
Just Now!
X