काळा पैशाविरोधात आयकर विभागाची मोहीम सुरु असून याप्रकरणांमध्ये आता बँकांमधील गैरव्यवहारही समोर येत आहे. दिल्लीतील अॅक्सिस बँकेत तब्बल ४४ बनावट खाती आढळली असून या बँक खात्यांमध्ये १०० कोटींपेक्षा जास्त रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे. बँकेतील अधिका-यांची स्थानिक पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
रिझर्व्ह बँकेने देशभरातील सर्व बँकांमध्ये केवायसी बंधनकारक केले आहे. बँकांनी त्यांच्या ग्राहकांकडून महत्त्वाची जाणून घेणे अपेक्षित आहे. मात्र दिल्लीतील चांदनी चौकमधील अॅक्सिस बँकेत या नियमाचे पालन केले गेले नाही. अॅक्सिस बँकेतील ४४ खात्यांमध्ये केवायसी झालेले नाही अशी माहिती आयकर विभागाच्या तपासातून समोर आली आहे. अॅक्सिस बँकेतील दोन शाखा व्यवस्थापकांना सक्तवसुली संचालनालयाने या आठवड्याच्या सुरुवातीला अटक केली. त्यांच्याकडून ३ किलो सोने जप्त करण्यात आले होते. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. बँक अधिकारांच्या संगनमताने जुन्या नोटा बदलून देणारे रॅकेट समोर आले होते. या रॅकेटमध्ये दोघांचा समावेश होता.
दरम्यान, आयकर विभागाने शुक्रवारीही देशभरात कारवाईचा धडाका सुरुच ठेवला. चेन्नईतून गुरुवारी आणि शुक्रवारी अशा दोन दिवसांत १२७ किलोचे सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत ३६ कोटी रुपये ऐवढी असल्याचे समोर आले आहे. तर मुंबईत दादरमधून ८५ लाख रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. गुजरातमधील सूरतमध्येही ७६ लाख रुपयांच्या नवीन नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.
UPDATE: Over Rs 100 cr found in 44 bank a/cs that didnt follow KYC norms at Axis Bank, Chandni Chowk branch. Bank officials being questioned
— ANI (@ANI) December 9, 2016
Delhi: IT dept conduct survey at Axis Bank, Chandni Chowk branch. 15 accounts found to be fake. Rs. 70 cr deposited in these fake accounts.
— ANI (@ANI) December 9, 2016