बलात्कार आणि हत्या प्रकरणातला आरोपी असलेला बाबा राम रहीम हा एक दिवसाच्या सिक्रेट पॅरोलवर बाहेर आला. २४ ऑक्टोबरला त्याला हा पॅरोल मंजूर करण्यात आला. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा भोगणारा बाबा राम रहीम हा आरोपी एक दिवसासाठी तुरुंगाबाहेर असणार आहे. बलात्कार आणि खून प्रकरणात दोषी ठरल्यानंतर डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीमला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच्या आईची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे एक दिवसाचा पॅरोल आईला भेटण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. राम रहीम या दरम्यान फरार होऊ नये म्हणून सुरक्षाही तैनात करण्यात आली आहे.

बाबा राम रहीमच्या आईला गुरुग्राममधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. २४ ऑक्टोबर रोजी त्याला पॅरोल मंजूर केल्यानंतर संध्याकाळपर्यंत तो आईजवळ होता. हरयाणामधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना या पॅरोलची माहिती होती. यापूर्वीही राम रहीमला पगार देण्याची चर्चा समोर आली होती.