News Flash

सापडलं! करोनावर अत्यंत प्रभावी ठरणारं हेच ते ‘डेक्सामेथासोन’ औषध

मृत्यू दर कमी होत असल्याचे समोर आले आहे.

जगातील बहुतांश देशांना त्रस्त करुन सोडणाऱ्या करोना व्हायरसवर अखेर प्रभावी ठरणारे एक औषध शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे. या औषधाचा वापर करुन करोनामुळे चिंताजनक प्रकृती असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य आहे. डेक्सामेथासोन असे या औषधाचे नाव आहे. हे जेनेरिक स्टेरॉइड प्रकारातील औषध आहे.

या औषधामुळे मृत्यू दर कमी होत असल्याचे समोर आले आहे. डेक्सामेथासोनचा कमी प्रमाणात डोस देऊन गंभीर अवस्था असलेल्या तीन रुग्णांपैकी एकाचे प्राण वाचवता येतात. संशोधकांनी अभ्यासातून हा निष्कर्ष मांडला आहे. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

यूकेमधील क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध रुग्णांवर प्रभावी ठरलं आहे. या औषधाच्या चाचणीतून समोर आलेले निष्कर्ष म्हणजे महत्वाचा शोध आहे, असे या अभ्यासात सहभागी असलेल्या वैज्ञानिकांनी म्हटलं आहे. करोनामुळे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल असलेल्या रुग्णांवर तात्काळ या औषधाचा वापर सुरु करावा असं वैज्ञानिकांच मत आहे.

“करोनामुळे व्हेंटिलेटर किंवा ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना डेक्सामेथासोनचा डोस दिल्यानंतर ते रुग्ण बरे होत असल्याचे दिसले आहे. महत्वाचं म्हणजे हे औषधही कमी खर्चिक आहे” असे मार्टिन लँडरे म्हणाले. ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक असलेले मार्टिन या संशोधनात सहभागी होते.

करोनाचा सर्वत्र होणारा फैलाव रोखण्यासाठी सध्या जगभरात लस निर्मितीचे काम सुरु आहे. विविध लस संशोधन प्रकल्प चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यावर आहेत. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत किती लसी यशस्वी ठरल्या ते स्पष्ट होईल. अमेरिकेसह ऑक्सफर्ड विद्यापीठाने बनवलेली लसही क्लिनिकल चाचणीच्या दुसऱ्या स्टेजवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2020 7:53 pm

Web Title: dexamethasone medicine on corona virus it reduces death rate dmp 82
Next Stories
1 जादूटोण्याच्या संशयावरुन मामीचा खून; शीर हातात घेऊन पोलीस स्थानकात गेला अन्…
2 डॉन छोटा शकीलच्या मोठ्या बहिणीचा करोनामुळे मृत्यू
3 बदला घ्या, बलिदान वाया जाता कामा नये – असदुद्दिन ओवेसी
Just Now!
X