21 September 2020

News Flash

डीएमके नेते आणि करुणानिधी यांचे पुत्र अलागिरी पक्षातून निलंबित

माजी केंद्रीय मंत्री आणि डीएमकेचे नेते एम. के. अलागिरी यांना शुक्रवारी पक्षातून निलंबित करण्यात आले.

| January 24, 2014 02:12 am

माजी केंद्रीय मंत्री आणि डीएमकेचे नेते एम. के. अलागिरी यांना शुक्रवारी पक्षातून निलंबित करण्यात आले. पक्षप्रमुख आणि अलागिरी यांचे वडील एम. करुणानिधी यांनीच हा निर्णय घेतला. अलागिरी यांना पक्षाच्या सर्व पदावरून हटविण्यात आले असून, त्यांचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे.
विजयकांत यांच्या डीएमडीके पक्षासोबत लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी करण्याविरोधात मत प्रदर्शन केल्यामुळे अलागिरी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या या निर्णयाविरोधात मत मांडण्यासाठी पक्षांतर्गत व्यासपीठ उपलब्ध असताना त्याचा वापर न करता थेटपणे सार्वजनिकरित्या विजयकांत यांच्यावर टीका केल्यामुळे अलागिरी यांना पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याचे पक्ष सचिव के. अनबाझागन यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 2:12 am

Web Title: dmk suspends alagiri
टॅग M Karunanidhi
Next Stories
1 सोमनाथ भारतींना काढण्यासाठी वाढता दबाव; केजरीवाल राज्यपाल भेट
2 राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी माजीद मेमन
3 तेलुगू अभिनेते नागेश्वर राव यांचे निधन
Just Now!
X