पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात २१ मे रोजी अफगाण तालिबानचा माजी प्रमुख मुल्लाह अख्तर मन्सूर ठार झाल्याचे डीएनए चाचणीतून स्पष्ट झाले आहे, असे सरकारच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले.

सदर ड्रोन हल्ल्यात ठार झालेल्या दुसऱ्या इसमाची ओळख पटली असून तो तालिबानचा माजी म्होरक्या मुल्लाह अख्तर मन्सूर असल्याचे स्पष्ट झाले आहे. अफगाणिस्तानातून मुल्लाहचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या नातेवाईकाची आणि मुल्लाहची डीएनए चाचणी जुळल्याचे अंतर्गत मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. बलुचिस्तानच्या नोशकी जिल्ह्य़ात अमेरिकेने मुल्लाहच्या वाहनाला लक्ष्य केले त्यामध्ये त्याच्यासह वाहनचालक मोहम्मद आझम ठार झाला.