21 September 2020

News Flash

पुणेरी पत्रकाराचा डोनाल्ड ट्रम्पना झटका: विचारला अवघड प्रश्न

व्हाइट हाऊसच्या पत्रकारकक्षात सर्वचजण चकीत झाले...

संग्रहित छायाचित्र

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ही जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती. त्यांच्याबरोबर बोलताना, त्यांना प्रश्न विचारताना लोक दहा वेळा विचार करतात. पण पुण्यात जन्मलेल्या एका भारतीय-अमेरिकन वंशाच्या पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना थेट असा प्रश्न विचारला की, व्हाइट हाऊसच्या पत्रकारकक्षात सर्वचजण चकीत झाले.

शिरीष दाते असे ट्रम्प यांना रोखठोक प्रश्न विचारणाऱ्या भारतीय अमेरिकन वंशाच्या पत्रकाराचे नाव आहे. त्यांचा जन्म पुण्यात झाला आहे. ते हफिंगटन पोस्टचे प्रतिनिधी म्हणून व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते. तुम्ही जे खोटं बोलता, तुम्हाला तुमच्या अप्रमाणिकपणाबद्दल पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न शिरीष दाते यांनी ट्रम्प यांना थेट विचारला. मागच्या पाच वर्षांपासून मला ट्रम्प यांना हा प्रश्न विचारायचा होता असे टि्वट दाते यांनी केले आहे.

आणखी वाचा- खोटं बोलण्याबद्दल पश्चाताप वाटतो का? ट्रम्प यांना थेट प्रश्न विचारणारे पुणेकर शिरीष दाते कोण आहेत?

शिरीष दाते यांनी नेमका काय प्रश्न विचारला?
मिस्टर प्रेसिडंट आज तीन-साडेतीन वर्षानंतर, अमेरिकन जनतेशी तुम्ही जे खोटं बोललात, त्याबद्दल तुम्हाला पश्चाताप वाटतो का? असा प्रश्न विचारला. पत्रकाराकडून असा प्रश्न आल्यानंतर ट्रम्प थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी पुन्हा प्रश्न विचारायला सांगितला. त्यावर दाते यांनी पुन्हा तोच प्रश्न केला. त्यावर ट्रम्प यांनी काहीही प्रतिक्रिया न देता दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे वळले.

ट्रम्प यांच्यासाठी हा प्रसंग अजिबात धक्कादायक नव्हता. कारण यापूर्वी व्हाइट हाऊसमधील पत्रकार परिषदांमध्ये ट्रम्प यांचा पत्रकारांबरोबर अनेकदा वाद झाला आहे. यावर्षाच्या अखेरीस अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ७५ वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा रिपब्लिकन पक्षाकडू उमेदवारी मिळवून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाकडून जो बिडेन यांचे आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2020 11:16 am

Web Title: do you regret all your lies indian american pune born reporter bluntly asks donald trump dmp 82
Next Stories
1 ‘आमचे जवान काय करु शकतात, ते संपूर्ण जगाने लडाखमध्ये पाहिले’
2 देशभरात २४ तासांत ६५ हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित, ९९६ मृत्यू
3 करोना लसीबद्दल काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
Just Now!
X