दिल्लीमधील सरकारी रुग्णालयात डॉक्टराचा अक्षम्य हलगर्जीपणाचा फटका एका रुग्णाला बसला आहे. डॉक्टराने डोक्याला जखम झाल्याने रुग्णालयात भर्ती करण्यात आलेल्या रुग्णाच्या पायाचीच सर्जरी करुन टाकली. सुश्रूता ट्रॉमा सेंटरमध्ये हा प्रकार घडला असून, दिल्ली सरकार हे रुग्णालय चालवतं.

विजेंद्र त्यागी यांचा अपघात झाल्याने त्यांचा डोक्याला गंभीर जखम झाली होती. उपचारासाठी त्यांना ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याचवेळी त्याच वॉर्डमध्ये एक रुग्ण पाय फ्रॅक्चर झाल्याने भर्ती करण्यात आला होता. सर्जनचा गैरसमज झाला आणि त्याने विजेंद्र त्यागी यांचा पाय फ्रॅक्चर झाला असल्याचं समजून त्यांच्या पायावर सर्जरी करुन टाकली.

dombivli aarogyam hospital
डोंबिवलीतील आरोग्यम रुग्णालयातील डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांना महिला रुग्णाच्या नातेवाईकाचे चावे
Rat case Sassoon hospital, Rat case,
ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात दोषी कोण? अखेर सत्य येणार बाहेर
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
civil service servants vehicle with a board coming to wrong side
चक्क अधिकाऱ्याच्या गाडीने मोडला वाहतूक नियम! भर रस्त्यावर थांबवताच पेटला वाद, पाहा VIDEO

‘सर्जनने माझ्या वडिलांच्या पायात पिन टाकण्यासाठी एक भोकदेखील पाडलं. भूलीचं औषध दिलं असल्या कारणाने त्यांना काहीच कळलं नाही ज्यामुळे त्यांनी चूक लक्षात आणून दिली असती’, असं विजेंद्र यांचा मुलगा अंकित त्यागीने सांगितलं आहे. अंकितनेच हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या निदर्शनास आणून दिला.

चुकीची सर्जरी झाली असल्याचं लक्षात येताच १९ एप्रिलला सकाळी ९.३० वाजता पुम्हा एकदा विजेंद्र यांच्यावर सर्जरी करुन पिन काढण्यात आली अशी माहिती अंकितने दिली आहे.

ट्रॉमा सेंटरच्या वैद्यकीय अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समितीने आरोपात तथ्य असल्याचं सांगितलं असून, संबंधित सर्जनवर कारवाई करण्यात आली आहे. सर्जनला सर्जनी करण्यापासून रोखण्यात आलं असून, यापुढे वरिष्ठांच्या परवानगीशिवाय तो कोणतंही काम करणार नाही.

‘जखम झाल्याने माझ्या वडिलांच्या डोकं आणि छातीत अद्यापही वेदना होत आहेत. विनाकारण करण्यात आलेल्या सर्जरीमुळे माझ्या वडिलांना चालता येत नाहीये’, असं अंकितने सांगितलं आहे. मात्र कुटुंबाने डॉक्टराविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्याचा निर्णय घेतला आहे.