News Flash

कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी सोमनाथ भारतींविरुद्ध आरोपपत्र

सोमनाथ भारती यांची पत्नी लिपिका यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती

| April 6, 2016 02:34 am

छत्तीसगडच्या दौऱ्यावर आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी कायदा मंत्री सोमनाथ भारती यांना सरकारी गेस्ट हाऊसमध्ये उंदरांनी त्रस्त केले.

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात आम आदमी पक्षाचे आमदार व माजी मंत्री सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध दिल्ली पोलिसांनी मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. यामुळे सध्या जामिनावर असलेल्या भारती यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणावर २३ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

सोमनाथ भारती यांची पत्नी लिपिका यांनी त्यांच्याविरोधात पोलिसांत कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीनुसार लिपिका या गर्भवती असताना सोमनाथ भारती यांनी आपला कुत्रा त्यांच्या अंगावर सोडला. कुत्र्याने लिपिका यांचा चावा घेतला. या हिंसक कृतीद्वारे सोमनाथ यांनी आपल्याबरोबरच गर्भातील बाळाचा जीव धोक्यात घालण्याचा प्रयत्न केला, असा आरोप लिपिका यांनी तक्रारीत केला आहे. या प्रकरणात सोमनाथ भारती यांच्याविरुद्ध कलम ३०७ बरोबरच संबंधित कलमांद्वारे गुन्हा सिद्ध करण्यासाठी सबळ पुरावे आहेत, असे या आरोपपत्रात म्हटले आहे. भारती यांच्याबरोबरच या प्रकरणात कपिल वाजपेयी, बानेय सिंग आणि नितीश या तिघांची नावे आरोपपत्रात आहेत. आरोपपत्रात भारती यांची आई मनोरमा भारती यांचाही उल्लेख आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 2:34 am

Web Title: domestic violence case chargesheet against somnath bharti
टॅग : Somnath Bharti
Next Stories
1 बिहारमध्ये दारूबंदी लागू
2 नासाच्या स्पर्धेत भारतीय विद्यार्थ्यांचे चार संघ
3 ‘गोध्रा’नंतरच्या जाळपोळ प्रकरणात तीस आरोपींची निर्दोष मुक्तता
Just Now!
X