News Flash

हुशार भारतीय विद्यार्थ्यांनी अमेरिकेतच राहावे – ट्रम्प

दवी घेऊन ते भारतात परतल्यानंतर उद्योगांची स्थापना करून अनेकांना रोजगार मिळवून देतात.

| March 16, 2016 03:48 am

डोनाल्ड ट्रम्प

देशाला हुशार लोकांची गरज आहे, त्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठांत शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना हाकलून लावता कामा नये, असे अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे इच्छुक उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. फॉक्स न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केले. मुलाखतीत त्यांनी आपली स्थलांतरितांसंबंधी भूमिका स्पष्ट केली. ट्रम्प सरसकट सर्व स्थलांतरितांच्या विरोधात असावेत, असे मानण्यात येत होते. मात्र तसे नसल्याचे त्यांनी या वेळी सूचित केले. भारतातील अतिशय हुशार विद्यार्थी अमेरिकेतील हार्वर्डसारख्या दर्जेदार विद्यापीठांत शिक्षणासाठी येतात. पदवी घेऊन ते भारतात परतल्यानंतर उद्योगांची स्थापना करून अनेकांना रोजगार मिळवून देतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 3:48 am

Web Title: donald trump favours indian students staying back in usc
टॅग : Donald Trump
Next Stories
1 मदर तेरेसा यांच्या संतपदावर शिक्कामोर्तब
2 वैवाहिक बलात्कार गुन्हा ठरवल्यास कुटुंब व्यवस्थेवर ताण – गृह राज्यमंत्री
3 रविशंकर यांच्या कार्यक्रमात शर्विलकांच्या टोळ्यांचा पाहुण्यांना झटका
Just Now!
X