25 November 2020

News Flash

अमेरिका : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या मुलाला झाली करोनाची लागण

रिपोर्ट आल्यापासून ते आपल्या कॅबिन जवळच क्वारंटाइन...

(डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर यांचं संग्रहित छायाचित्र, सौजन्य - AP)

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा मुलगा डोनाल्ड ट्रम्प ज्युनिअर (Donald Trump Jr) यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली.

“या आठवड्याच्या सुरूवातीला ट्रम्प ज्युनिअरला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं असून रिपोर्ट आल्यापासून ते आपल्या कॅबिन जवळच क्वारंटाइन आहेत”, अशी माहिती त्यांच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली आहे. दरम्यान, “अद्याप त्यांच्यात करोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत, ते कोविड 19 (COVID 19) शी संबंधित सर्व वैद्यकिय मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करत आहेत”, अशी माहितीही त्यांच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

ट्रम्प ज्युनिअर यांच्याआधी त्यांचे लहान भाऊ बेरोन, वडील डोनाल्ड ट्रम्प आणि आई मेलानिया ट्रम्प यांनाही करोनाची लागण झाली होती. सध्या जगातील सर्वाधिक कोरोनाबाधित रूग्ण हे अमेरिकेत आहेत. आतापर्यंत अमेरिकेत 2,53,000 पेक्षा अधिक लोकांचे प्राण गेले आहेत. तर 1.17 कोटी पेक्षा अधिक लोकांना करोनाची लागण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 10:45 am

Web Title: donald trumps eldest son donald trump jr tests positive for coronavirus sas 89
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus update : देशात २४ तासांत ४६ हजार रुग्णांची वाढ
2 काँग्रेसचा कोणी माय-बाप शिल्लक नाही, मत कोणालाही द्या सरकार भाजपाचंचं बनतं : केजरीवाल
3 Coronavirus : एअर इंडियाच्या विमानांवर हाँगकाँगने पाचव्यांदा घातली बंदी
Just Now!
X