News Flash

करोनाचा धसका : ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह राहणार बंद

सिने संघटनांनी घेतला निर्णय

चीनमधून जगभरात पसरलेल्या करोना व्हायरसचा धसका आता भारतीयांनीही घेतला आहे. करोनामुळे अनेक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. त्यातच आता सिनेमा बघण्यावरही बंधनं आली आहेत.

केरळमध्ये करोना व्हायरसचे आणखी ६ संशयित आढळले आहेत. त्यामुळे तेथील करोना संशयितांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केरळमधील काही मल्याळम सिने संघटनांनी ३१ मार्चपर्यंत सिनेमागृहे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोची येथे मल्याळम सिने संघटनांची बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता केरळमध्ये ३१ मार्चपर्यंत सिनेमागृह बंद राहणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी एकाच व्यक्तीकडून अनेकांना करोना व्हायरसचा संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. असं घडू नये, याची खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे केरळच्या सिने संघटनांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2020 4:28 pm

Web Title: due to coronavirus cinema theatres will remain closed from tomorrow till march 31 in the kerala pkd 81
Next Stories
1 पाच दिवसांचा आठवडा रद्द, आता केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी
2 ज्योतिरादित्य शिंदेंची घरवापसी झाल्याचा आनंद-यशोधरा शिंदे
3 मध्य प्रदेशनंतर भाजपाच्या निशाण्यावर महाराष्ट्र?
Just Now!
X