मलेशियातील बोर्नियो बेटांवर सबाह जिल्हय़ात ६ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. अमेरिकी भूगर्भशास्त्रज्ञांनी सांगितले, की या भूकंपात हानी झाली नसून सुनामी लाटांचा इशाराही देण्यात आलेला नाही. अमेरिकी भूगर्भशास्त्रीय संस्थेने म्हटले आहे, की भूकंपाचे केंद्र सबाह जिल्हय़ातील कोटा किनाबालूपासून ५४ किमी. अंतरावर तर राणावूपासून १९ किलोमीटर अंतरावर, तसेच १० किलोमीटर खोलीवर होते.