दिल्ली आणि आसपासच्या परिसरात रविवारी दुपारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल असल्याची माहिती भूकंपविज्ञान केंद्राकडून देण्यात आली. महिन्याभरात तिसऱ्यांदा या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

रविवारी दुपारी दिल्ली आणि नजीकच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.५ असल्याचं सांगण्यात आलं आहे. या भूकंपाचं केंद्र दिल्ली आणि उत्तर प्रदेशनजीकच्या सीमाभागात असल्याचं सांगणअयात येत आहे. काही दिवसांपूर्वीही या भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. सध्या या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली नाही.

२४ तासांत दोनदा भूकंपाचे धक्के

यापूर्वी १२ आणि १३ एप्रिल रोजी दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. १२ एप्रिल रोजी संध्याकाळच्या सुमारास दिल्ली एनसीआर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेकजण आपापल्या घरातच होते. त्यामुळे अनेकांना हे धक्के जाणवले होते. तेव्हा भूकंपाती तीव्रता रिश्टर स्केलवर ३.५ असल्याचं सांगण्यात आलं होतं. तसंच दिल्लीतील पूर्व भागात भूकंपाचं केंद्र असल्याची माहितीही देण्यात आली होती. तर त्यानंतर १३ एप्रिल रोजी पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी होती.