जम्मू-काश्मीरमधील काही भागासह व हिमाचल प्रदेशातील (चंबा) सीमा भागात सोमवारी दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी भूकंपाचा धक्के बसले. रिश्टर स्केलवर ५.० इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली.

हिमाचल प्रदेशातील चंबा भागात सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचा धक्का जाणवल्याने, येथील नागरिकांमध्ये काहीप्रमाणात भीतीचे वातारवण निर्माण झाले होते. काही वेळासाठी येथील नागरिक घराबाहेर येऊन मैदानात थांबले होते. रविवारी देखील दोनवेळा या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले होते. त्यानंतर सोमवारी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचे केंद्र जम्मू-काश्मीर आणि चंबा सीमा परिसरात ५ किलोमीटर खोलवर भूगर्भात होते.

सुदैवाने यामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. याचबरोबर पांगी व कांगडासह लाहुल-स्पिती जिल्ह्यात देखील भूकंपाचा धक्का जाणवला असल्याची माहिती आहे.