जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाई सुरु ठेवली असून चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती.  अनंतनाग येथील श्रीगुफवारा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु होती. पहाटे तीन ते चार दहशतवादी याठिकाणी लपले असल्यची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा जवानांनी त्यांना घेरलं होतं. दरम्यान चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे.

जम्मू काश्मीरचे डीजीपी एस पी वैद्य यांनी सुरुवातीला दिलेल्या माहितीनुसार, ‘पहाटे ही चकमक सुरु झाली होती. त्यावेळी तीन ते चार दहशतवादी परिसरात लपले असल्याची माहिती मिळाली होती. तिनही दहशतवाद्यांचा मृतदेह हाती लागला आहे. चकमकीत एक पोलीस जवान शहीद झाला असून दोन नागरिक जखमी झाले आहेत’.

रमझान महिन्यात लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी उठवल्यानंतर दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आला आहे.