इजिप्त एअरचे जे विमान गेल्या गुरूवारी पॅरिसहून कैरोला जाताना कोसळले होते, त्यातील मानवी अवशेषांची तपासणी केली असता हे विमान स्फोटामुळे कोसळल्याचे संकेत मिळाले आहेत, असे इजिप्तच्या न्यायवैद्यक अधिकाऱ्यांनी सांगितले.  स्फोटामुळे विमान कोसळले असे या घटनेचे स्पष्टीकरण आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले असून विमान कोसळण्याबाबत चौकशी करणाऱ्या इजिप्तच्या पथकातील अधिकाऱ्याने सांगितले, की कैरो येथील शवागारात मृतदेहांची तपासणी आपण स्वत: केली असून हे विमान स्फोटामुळे कोसळले आहे यात शंका नाही. मृतदेहांचे जे ८० तुकडे कैरोत आणले आहेत त्यात शरीराचा एकही पूर्ण भाग नाही. डोके, हात, पायही पूर्ण नाहीत; एक तुकडा तर डोक्याच्या डाव्या भागाचा आहे. पण स्फोट कशामुळे झाला हे सांगता येत नाही.

इजिप्शियन अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहतवाद्यांनीच या विमानात विध्वंसक कृत्ये केली असावीत. ग्रीसच्या संरक्षण मंत्र्यांच्या मते या विमानात बॉम्बस्फोट झाला असावा किंवा कॉकपीटमध्ये संघर्ष झाला असावा पण त्याचे कुठलेही पुरावे नाहीत. अल वतन या कैरोतील वृत्तपत्राने अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे म्हटले आहे की, विमान हवेत असतानाच उडाले, पण त्यासाठीचा स्फोट एखाद्या यंत्राने घडवला किंवा कसे हे समजलेले नाही. आतापर्यंत शरीराचे जे भाग सापडले आहेत त्यात एकही हातापेक्षा मोठय़ा आकाराचा नाही. काही मृत प्रवाशांचे नातेवाईक मंगळवारी कैरो येथील शवागारात ओळख पटवण्यासाठी आले होते. त्यांनी डीएनए नमुन्यांची मागणी केली आहे. इजिप्तने या अपघातातील विमानाचे ब्लॅक बॉक्स शोधण्यासाठी पाणबुडी पाठवली होती. फ्रान्सनेही यात मदत सुरू केली आहे. ब्रिटन, सायप्रस, फ्रान्स, ग्रीस व अमेरिका या देशांची जहाजे व विमाने अपघातग्रस्त विमानांच्या अवशेषांचा शोध घेत आहेत.

wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
palestine
इस्रायलचे दोन लष्करी अधिकारी बडतर्फ
israeli air strike destroys iranian consulate in syria
सिरीयातील इराणच्या दूतावासावर इस्रायलचा हवाई हल्ला; किमान ६ ठार झाल्याचा युद्धविरोधी संस्थेचा दावा
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल