News Flash

जम्मू विमानतळावर मोठा स्फोट; फॉरेन्सिक आणि बॉम्बशोध पथक दाखल

हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे

हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे

जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे. स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.

स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

भारतीय हवाई दलाकडून चालवल्या जाणाऱ्या सतवारी हवाई दल स्टेशनवर हा स्फोट झाला आहे. पहाटे २ वाजता हा स्फोट झाला आहे. स्फोटामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
पोलीस सध्या हवाई दलाकडून प्राथमिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2021 7:44 am

Web Title: explosion inside air force operated area at jammu airport sgy 87
Next Stories
1 शेतकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांकडून पाण्याचा मारा
2 जम्मू-काश्मीरमध्ये अविश्वासाचे वातावरण – डॉ. फारूक अब्दुल्ला
3 विशेष अधिकार देण्याची सूचना
Just Now!
X