News Flash

भारत-पाक चर्चेनंतर सुषमा स्वराज मंगळवारी पाकिस्तानला जाणार

अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये त्या सहभागी होणार आहेत.

भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याचे निश्चित केले आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला रविवारी बॅंकॉकमध्ये सुरुवात झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री मंगळवारी पाकिस्तानला रवाना होणार आहेत. अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी त्या पाकिस्तानला रवाना होणार आहेत.
बॅंकॉकमध्ये झालेल्या चर्चेवेळी दोन्ही देशांचे परराष्ट्र सचिवदेखील उपस्थित होते. बैठकीसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार, उभय प्रतिनिधींनी विविध मुद्‌द्‌यांवर चर्चा करीत दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ करण्यावर तसेच पॅरिस येथे दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान झालेल्या अनौपचारिक चर्चेची फलनिष्पत्ती म्हणूनच या बैठकीकडे पाहिले जात आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्तरावरील चर्चेला सुरुवात झाल्यानंतर सुषमा स्वराज यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी पाकिस्तानला जाण्याचे निश्चित केले आहे. अफगाणिस्तान संदर्भातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन त्या भूमिका मांडणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 11:24 am

Web Title: external affairs minister sushma swaraj to travel to pakistan
टॅग : Pakistan,Sushma Swaraj
Next Stories
1 … आणि सचिनने राज्यसभेत विचारला प्रश्न
2 हेरगिरी प्रकरणी लष्करातील हवालदाराला अटक
3 पॅरिस हवामान बैठक अपयशी होऊ देणार नाही
Just Now!
X