पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं प्रदर्शन घडवण्यासाठी केलेल्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र यावेळी थाळी वाजतवाना करण्यात आलेली त्याप्रमाणे काहीजण हुल्लडबाजी करताना दिसून आले. उज्जैन येथे असंच एका तरुणाने दिवे लावण्याऐवजी तोंडात रॉकेल भरुन आगीचे गोळे काढण्याचा प्रयत्न केला. पण यावेळी त्याला आयुष्यभरासाठीची अद्दल घडली आहे.

रविवारी रात्री एकीकडे लोक घराच्या गॅलरी, खिडकीत दिवा लावून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत असताना काहीजण मात्र रस्त्यावर उतरले होते. उज्जैन येथे असाच एक तरुण रस्त्यावर उतरुन लोकांना कलाबाजी करुन दाखवत होता. तरुण तोंडात रॉकेल भरुन आगीचे गोळे काढून दाखवत होता. त्याची ही कलाबाजी पाहण्यासाठी काही लोकही तिथे उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र यावेळी त्याच्या चेहऱ्याला आग लागली. त्याच्या सुदैवाने आजूबाजूला काही तरुण उपस्थित होते. ज्यांनी लगेच धाव घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावरील आग विझवली. पण यामुळे तरुणाला आयुष्यभरासाठीची अद्दल घडली आहे. तरुणाचा चेहरा गंभीर भाजला आहे. दरम्यान घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.