दिवसभरातील पहिली महत्वाची बातमी आहे हिमाचल प्रदेशमध्ये उघडकीस आलेल्या एका घोटाळ्याबद्दलची. हिमाचलमध्ये सहा हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आला असून हा आत्तापर्यंतचा राज्यातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे क्रिकेटपटू हार्दिक पंड्या त्याने केलेल्या एक जुन्या ट्विटमुळे अडचणीत सापडला आहे. याशिवाय देश-विदेश, राजकारण, समाजकारण, क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींबद्दल जाणून घेऊयात लोकसत्ताच्या ऑनलाइन बुलेटीनमध्ये.