21 September 2020

News Flash

कृष्णवर्णीय मुलाच्या खून प्रकरणी श्वेतवर्णीय अधिकाऱ्याचा राजीनामा

अमेरिकेतील श्वेतवर्णीय अधिकाऱ्याने फग्र्युसन येथील सेंट लुईस उपनगरात नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलावर गोळीबार करून त्याला ठार केल्याच्या प्रकरणी राजीनामा दिला आहे.

| December 1, 2014 04:57 am

अमेरिकेतील श्वेतवर्णीय अधिकाऱ्याने फग्र्युसन येथील सेंट लुईस उपनगरात नि:शस्त्र कृष्णवर्णीय मुलावर गोळीबार करून त्याला ठार केल्याच्या प्रकरणी राजीनामा दिला आहे.
डॅरन विल्सन याने म्हटले आहे की, स्थानिक लोकांची सुरक्षा व सहकारी पोलीस अधिकाऱ्यांचे हित पाहून आपण राजीनामा देत आहोत. आपल्या राजीनाम्याने कृष्णवर्णीयांनाही दिलासा मिळेल असे त्यांनी म्हटले आहे.
न्यायाधीशांनी त्यांच्यावर ९ ऑगस्टच्या या घटनेप्रकरणी आरोप ठेवण्यास नकार दिला होता. १८ वर्षांचा मायकेल ब्राऊन या हल्ल्यात ठार झाला होता. निकालानंतरही मोठय़ा प्रमाणात निदर्शने झाली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:57 am

Web Title: ferguson shooting officer wilson who killed black teen resigns from force
Next Stories
1 मध्य प्रदेशात महिलांपेक्षा पुरुष रुग्ण अधिक
2 रशियाच्या ‘लेवियाथन’ चित्रपटास ‘सुवर्णमयूर’ पुरस्कार जाहीर
3 विनाअनुदानित गॅस सिलिंडर स्वस्त, ११३ रुपयांची बचत
Just Now!
X