News Flash

कुमार विश्वास यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करा, कोर्टाचे आदेश

कुमार विश्वास यांनी आपल्यावरील सर्व आरोप याआधीच फेटाळले आहेत

आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यांच्याविरोधात पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतर कुमार विश्वास यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप पक्षातील एका महिलेने केला होता. त्या पार्श्वभूमीवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुमार विश्वास यांनी आपल्यावरील सर्व आरोप याआधीच फेटाळले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी केलेल्या प्राथमिक तपासात कुमार विश्वास यांच्याविरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे दिल्ली पोलिसांकडून न्यायालयात सांगण्यात आले होते. संबंधित महिलेने मे २०१५ मध्ये दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार करताना कुमार विश्वास यांनी जाहीरपणे आपल्यासोबत कोणतेही संबंध नसल्याचे जाहीर करावे, असे आव्हानही त्यांना दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 6:26 pm

Web Title: file fir against kumar vishwas says court
टॅग : Kumar Vishwas
Next Stories
1 राष्ट्रीय स्तरावरील कबड्डीपटूची गोळ्या घालून हत्या
2 ‘भारत माता की जय’वरुन जावेद अख्तरांचे ओवेसींना प्रत्युत्तर
3 सोनिया गांधींना म्हणायचे होते एनडीए आणि म्हणाल्या यूपीए…
Just Now!
X