News Flash

जगातील १०० प्रभावी महिलांत सीतारामन

या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.

| December 14, 2019 03:38 am

निर्मला सीतारामन

फोर्ब्सच्या यादीत अँगेला मर्केल प्रथम स्थानावर

न्यूयॉर्क : फोर्ब्स नियतकालिकाच्या शंभर शक्तिशाली- प्रभावी महिलांच्या यादीत भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांचा समावेश करण्यात आला आहे. या शंभर महिलांत जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल पहिल्या क्रमांकावर आहेत.

यादीतील इतर भारतीय महिलांमध्ये एचसीएल कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक रोशनी नादर मल्होत्रा व बायोकॉनच्या संस्थापक किरण शॉ मजुमदार यांचा समावेश आहे.

फोर्ब्सची २०१९ची यादी ‘दी वर्ल्डस् १०० मोस्ट पॉवरफुल विमेन’ या नावाने प्रसिद्ध झाली असून त्यात मर्केल (वय ६५) प्रथम क्रमांकावर आहेत. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या प्रमुख ख्रिस्तिना लॅगार्ड या दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना २९ व्या क्रमांकावर आहेत.

सीतारामन  ३४ व्या क्रमांकावर असून त्या भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत. यापूर्वी इंदिरा गांधी यांनी अगदी कमी काळ अर्थमंत्रीपद सांभाळले होते.

मल्होत्रा या ५४ व्या क्रमांकावर असून त्या एचसीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ही कंपनी ८.९ अब्ज डॉलर्सची आहे. मजुमदार शॉ या  ६५ व्या क्रमांकावर असून त्या स्वयंश्रीमंत महिलांमध्ये आघाडीवर आहेत. बायोकॉन या कंपनीची स्थापना त्यांनी १९७८ मध्ये केली होती. त्यांनी संशोधन व पायाभूत व्यवस्थेत गुंतवणूक केली आहे.

फोर्ब्सच्या या यादीत गेट्स फाउंडेशनच्या मेलिंडा गेटस, आयबीएमच्या गिनी रोमेटी, फेसबुकच्या  शेरील सँडबर्ग, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अरडर्न, इव्हान्का ट्रम्प, गायक रिहान व बियॉन्स तसेच टेलर स्विफ्ट, टेनिस पटू सेरेना विल्यम्स, हवामान कार्यकर्ती  ग्रेटा थनबर्ग यांचाही समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2019 3:38 am

Web Title: finance minister nirmala sitharaman on forbes 100 most powerful women list zws 70
Next Stories
1 हाऊस ऑफ कॉमन्समध्ये भारतीय वंशाचे १५ खासदार
2 सुधारित नागरिकत्व कायदा : असंतोषाचे लोण उत्तर भारतात
3 बलात्कारांबाबतच्या वक्तव्यावरून राहुल लक्ष्य
Just Now!
X