News Flash

दहशतवाद्यांना आर्थिक रसद, पॅरिस बैठकीत पाकिस्तानची करणार कोंडी

भारताला मिळणार अमेरिकेची साथ

Nawaz Sharif : भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानशी द्विपक्षीय संबंध सुधारण्याचे सुतोवाच केल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाकडून तडकाफडकी कुलभूषण जाधव यांच्या फाशीचा निर्णय जाहीर करण्यात आला.

दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद बंद करण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी भारताने प्रयत्न सुरु केले आहे. पॅरिसमध्ये वित्तीय कृती दलाची (एफएटीएफ) १९ फेब्रुवारीपासून पाच दिवसांची बैठक सुरु होणार असून या बैठकीत जागतिक पातळीवरील आर्थिक व्यवहारांमध्ये पाकिस्तानमधून झालेल्या व्यवहारांची तपासणीही केली जाण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्यात पाकिस्तानने वित्तीय कृती दलाला अहवाल सादर केला होता. यामध्ये पाकिस्तानने दहशतवादी संघटनांची आर्थिक रसद बंद करण्यासाठी काय कारवाई केली याचा उल्लेख होता. पॅरिसमध्ये होणा-या बैठकीत अमेरिका आणि भारताचे अधिकारी पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतील अशी माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीत लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद यासारख्या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये सक्रीय असून या संघटना विविध उपक्रमांच्या माध्यमांतून आर्थिक पाठिंबा मिळवत असल्याचा दावा भारतातर्फे केला जाणार आहे. या संदर्भातील पुरावेही या बैठकीत मांडले जाणार आहे.

पॅरिसमधील बैठकीत तातडीने कारवाई होण्याची शक्यता कमीच आहे, मात्र पाकिस्तानवर दबाव निर्माण करता येईल असे अधिका-यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच इंडियन एक्सप्रेसने लष्कर ए तोयबा बनावट बँक खात्यांच्या माध्यमातून परदेशातून यूएस डॉलर्समध्ये पैसे जमा करत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.

पाकिस्तानने वित्तीय कृती दलाला दिलेल्या अहवालात लष्कर ए तोयबा सारख्या संघटनेविरोधात कठोर भूमिका घेता येणार नाही असे म्हटले होते. या संघटनेमध्ये स्थानिक सदस्यांचे प्रमाण जास्त आहे. कारवाई केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे पाकने म्हटले आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तानने लष्कर ए तोयबाचा प्रमुख हाफिज सईदला स्थानबद्ध केले होते. पण त्याच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2017 1:37 pm

Web Title: financial action task force paris meet pakistan face heat over terror funding
Next Stories
1 UP election 2017: प्रियांका गांधींवरील टीकेमुळे काँग्रेस नेते स्मृती इराणींवर भडकले
2 Demonetisation: दोन हजारांच्या नोटांची छपाई रघुराम राजन यांच्या काळातच
3 तामिळनाडूतील राजकीय नाट्यात ओ. पनीरसेल्वम एकाकी
Just Now!
X