News Flash

Fire Eclipse: भारतातल्या मोजक्या शहरांतून दिसणार दुर्मिळ सूर्यग्रहण

हे ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे.

या वर्षातील हे पहिले सूर्यग्रहण असणार आहे

या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण १० जून रोजी होणार आहे. तर हे वर्षातलं दुसरं ग्रहण असणार आहे. याआधी २६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या आधी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारताच्या इतर भागातूनही दिसणार नाही. जरी हे पूर्ण सूर्यग्रहण असेल,तरी भारतात ते अर्धवट स्वरूपात दिसणार आहे.

भारतात कधी दिसणार सूर्यग्रहण

हे ‘कंकणाकृती‘ सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी १.४२ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ६.४१ वाजता संपणार आहे. अरुणाचल प्रदेशातील दिबंग वन्यजीव अभयारण्याजवळून संध्याकाळी ५:५२ वाजता हे सूर्यग्रहण पाहता येणार आहे. तर लडाखच्या उत्तरेकडील भागात ते संध्याकाळी ६ च्या सुमारास दिसेल.

संपूर्ण सूर्यग्रहण येथून दिसणार

हे सूर्यग्रहण उत्तर अमेरिका, उत्तर कॅनडा, युरोप आणि आशिया, ग्रीनलँड, रशियाच्या बऱ्याचश्या भागांमध्ये दिसणार आहे. कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियामध्ये अंगठीच्या आकाराप्रमाणे दिसणार आहे. तर उत्तर अमेरिका, युरोप आणि उत्तर आशियाच्या बर्‍याच भागांत हे केवळ अर्धवट स्वरुपात दिसेल.

खंडग्रास आणि कंकणाकृती ग्रहण म्हणजे काय?

१४८ वर्षानंतर पहिल्यांदाच असणार असे सूर्यग्रहण

ज्योतिष शास्त्राच्या गणनेनुसार हे सूर्यग्रहण १४८ वर्षांनी जेष्ठ अमावस्येला हे ग्रहण दिसणार आहे. गुरुवारी म्हणजे १० जून रोजी हे ग्रहण लागणार आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे काय?

खग्रास सूर्यग्रहणाच्यावेळी जर चंद्र पृथ्वीपासून दूर असेल तर चंद्रबिंब लहान दिसत असल्याने सूर्यबिंबाला पूर्णपणे झाकून टाकू शकत नाही. सूर्याची प्रकाशित गोलाकार कडा दिसत असते. त्यालाच ‘ कंकणाकृती‘ अवस्था म्हणतात. भारतात हे सूर्यग्रहण सूर्यास्ताच्या आधी फक्त अरुणाचल प्रदेश आणि लडाखमध्येच दिसणार आहे.

सूर्य ग्रहण पाहाताना हे करून पाहाच

ग्रहण पाहण्यासाठी भारतीय मानक संस्थेने प्रमाणित केलेले गॉगल्स सर्वात चांगले. मात्र, सूक्ष्म-छिद्र कॅमेरा (पिन होल कॅमेरा) वापरून आपण ते पाहू शकतो. आणखी एक सोपा मार्ग म्हणजे गहू चाळायची चाळणी वापरणे. ग्रहणाच्या वेळेस ही चाळणी सूर्यकिरणे लंबरूप पडतील अशी धरायची. चाळणीखाली काही अंतरावर एखादा पांढरा सपाट कागद धरायचा. गंमत म्हणजे चाळणीला जेवढी भोके असतात तेवढे छोटे सूर्य आपल्याला दिसू लागतात आणि (मोठय़ा) सूर्याला ग्रहण लागले की या छोटय़ा सूर्यानादेखील ग्रहण लागते! या छोटय़ा सूर्याचा तुम्ही कॅमेऱ्याने/ मोबाइलने सहजपणे फोटो घेऊ शकता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 3:19 pm

Web Title: fire eclipse rare solar eclipse seen from few cities in india abn 97
Next Stories
1 उत्तर प्रदेश निवडणुकांआधीच काँग्रेसला मोठा झटका! माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपामध्ये!
2 काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल 
3 लडाख सीमेवर चीनचा युद्धसराव; भारतची प्रत्येक हालचालींवर बारीक नजर
Just Now!
X