26 September 2020

News Flash

अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये गोळीबार, हल्लेखोर ठार, तीन जखमी

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. शिकागो येथील मर्सी रुग्णालयात गोळीबाराची घटना घडली आहे. हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे.

अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबार झाला आहे. शिकागो येथील मर्सी रुग्णालयात गोळीबाराची घटना घडली आहे. हल्लेखोराचा मृत्यू झाला असून या गोळीबारात एकूण तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडून घेतली कि, सुरक्षा पथकांच्या कारवाईत तो मारला गेला हे अजून स्पष्ट झालेले नाही. रुग्णालयाच्या इमारतीच्या आत आणि बाहेर गोळया झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. संशयित हल्लेखोर महिलेसह पार्किंग लॉटच्या दिशेने चालत असताना तो अचानक वळला व त्याने महिलेच्या छातीत गोळया झाडल्या.

त्यानंतर त्याने रुग्णालयाच्या इमारतीत प्रवेश करुन अंदाधुंद गोळीबार सुरु केला असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अमेरिकन प्रसारमाध्यमांनुसार हा घरगुती हिंसाचाराचा प्रकार असून साखरपुडा मोडल्याच्या रागातून हे कृत्य केल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 6:43 am

Web Title: firing at chicago hospital in america
Next Stories
1 शिक्षिकेचा गळा चिरल्यानंतर प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न
2 विद्यार्थ्यांना नोकर बनवल्याचा अमेरिकेतील भारतीय वंशाच्या प्राध्यापकावर आरोप
3 रिझव्‍‌र्ह बँक-सरकारमध्ये समेट!
Just Now!
X