News Flash

छत्तीसगड – नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद ; दहा जखमी

बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात झाली चकमक

(संग्रहित छायाचित्र)

छत्तीसगडमधील बिजापूर येथील तारेम जवळच्या जंगलात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले असून, दहा जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

छत्तीसगडचे डीजीपी डीएम अवस्थी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शहीद जवानांमध्ये डीआरजी व सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे.

या अगदोर छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी घडविलेल्या भूसुरुंग स्फोटात पाच पोलीस शहीद झाले, तर १४ जण जखमी झाले होते.

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात पाच पोलीस शहीद

जिल्हा राखीव पोलीस दलातील २० कर्मचारी मंगळवारी नक्षलवादविरोधी मोहीम आटोपून खास बसद्वारे नारायणपूरकडे परतत होते. कदेनार आणि कान्हरगावदरम्यान नक्षलवाद्यांनी भूसुरूंग स्फोटाद्वारे ही बस उडवली. त्यात चालकाबरोबरच पाच पोलीस शहीद झाले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक (बस्तर परिमंडळ) सुंदरराज पी. यांनी दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2021 5:19 pm

Web Title: five security personnel died and around 10 others injured in an exchange of fire with naxals msr 87
Next Stories
1 पश्चिम बंगाल – अमित शाहांचा रोड शो झालेल्या ठिकाणी ४१ क्रूड बॉम्ब आढळल्याने खळबळ
2 अभिनेते-दिग्दर्शक तारिक शाह यांचे निधन
3 “करोनाकाळात जग थांबलं होतं, तेव्हा तुम्ही…!” रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचं कर्मचाऱ्यांसाठी खुलं पत्र!
Just Now!
X