News Flash

भूसंपादनालाच पाच वर्षे लागतील

भारतात भूसंपादन अवघड असून स्मार्ट शहरे व इतर पायाभूत सुविधांसह जमीन ताब्यात घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल

| August 2, 2015 03:53 am

भारतात भूसंपादन अवघड असून स्मार्ट शहरे व इतर पायाभूत सुविधांसह जमीन ताब्यात घेण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागेल, असे नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी सांगितले.
जमिनीची उपलब्धता हे मोठे आव्हान आहे व देशात त्यावर उलटसुलट चर्चा आहे असे सांगून ते म्हणाले की, नवीन शहरे बांधायची असतील तर त्यासाठी जमीन पाहिजे व उद्योगांसाठीही मोठी जागा पाहिजे, त्यामुळे आताच्या शहरातही मोठी जागा पाहिजे. सर्व अंदाजांचा विचार केला तरी भूसंपादनासाठी पाच वर्षे लागतील. कुठलीही प्रक्रिया सुरळित झाली पाहिजे त्यात स्वयंसेवी संस्था, न्याय संस्था व लोकांची निदर्शने हे अडथळे यायला नकोत पण ती आव्हाने स्वीकारल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. कमी चटई क्षेत्र निर्देशांकाचे भारतातील शहरांचे धोरण आहे व त्यामुळे जागांचे भाव वाढले आहेत, असे ते म्हणाले.
वेगाने नागरीकरण हवे आहे, वेगवान वाहतूक हवी आहे त्यामुळे लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज पोहोचू शकतील त्यामुळे लोकांना मुख्य शहराच्या बाहेर मोठय़ा जागांमध्ये रहायला मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 3:53 am

Web Title: five years to land handover
Next Stories
1 मायक्रोसॉफ्ट आणि मॉझिला आमने-सामने!
2 जीवसृष्टीस अनुकूल असलेल्या महापृथ्वीचा शोध
3 अमेठीतील खटला रद्द करा; केजरीवालांची मागणी
Just Now!
X