पत्नीच्या नावावर असलेली संपत्ती बळकावण्यासाठी नवऱ्याने तिची भोसकून हत्या केली. गुजरातच्या जुनागडमध्ये रविवारी रात्री ही दुर्देवी घटना घडली. किरण जोशी (४१) असे मृत महिलेचे नाव असून ती गुजरात पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होती.

पोलिसांनी या हत्ये प्रकरणी नवरा आणि सासरकडच्या तिघाजणांना अटक केली आहे. किरणच्या लग्नाला अवघे पाच महिने झाले होते. पोलिसांनी तिचा नवरा पंकड वेगडा, भाऊ दीपक, सासरे भवानीशंकर आणि सासू रसिला यांना अटक केली आहे.

पंकज बेरोजगार होता. त्याला बिझनेस चालू करण्यासाठी किरणची संपत्ती विकायची होती. तिच्या नावावर घर होते. त्यावर सासरकडच्या मंडळींचा डोळा होता असा आरोप किरणचा भाऊ महेशने केला आहे. किरणला नवऱ्याचा हा प्रस्ताव मान्य नव्हता. त्यावरुन त्यांच्यामध्ये बरेच वाद व्हायचे. दोघेही वेगळे झाले होते. घटनेच्या रात्री पंकज अन्य आरोपींसह किरणच्या घरी गेला व तिच्याबरोबर वाद घातला. त्यांनी धारदार शस्त्राने किरणवर वार केले. तिचा जागीच मृत्यू झाला. पत्नीची हत्या केल्यानंतर त्यांनी घर बंद केले व तिथून पळ काढला.