देशात गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ४६ हजार ७९० रुग्ण आढळले. तब्बल ८४ दिवसांनी म्हणजे जवळपास तीन महिन्यांनंतर पहिल्यांदाच रोजची रुग्णवाढ ५० हजारांपेक्षा कमी नोंदविण्यात आली. देशात आतापर्यंत ६७ लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनामुक्तांचे हे प्रमाण ८८.६० टक्के आहे.

देशभरात जुलैनंतर करोनाच्या रोजच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत गेली. सप्टेंबरच्या मध्यात ही वाढ सर्वाधिक म्हणजे ९० हजारांपेक्षाही अधिक झाली होती. आता मात्र करोना रुग्णवाढ प्रतिदिन ५०-६० हजारांच्या आसपास आहे.