20 September 2020

News Flash

राजकारणात पदार्पण करण्याची वाट खडतर- मेधा पाटकर

ईशान्य मुंबई मतदारसंघातून 'आम आदमी पक्षा'च्या तिकीटावर निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राजकारणात पदार्पण करणे कठीण असल्याची भावना व्यक्त केली.

| February 18, 2014 08:09 am

ईशान्य मुंबई मतदारसंघातून ‘आम आदमी पक्षा’च्या तिकीटावर निवडणुक लढवण्याच्या तयारीत असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी राजकारणात पदार्पण करणे कठीण असल्याची भावना व्यक्त केली. नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर आगामी लोकसभा निवडणुका ‘आम आदमी पक्षा’च्यावतीने लढणार आहेत. मात्र, अनेक घटकांचा विचार करता माझ्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकांचे आवाहन कठीण असल्याची कबुली मेधाताईंनी दिली. माझ्या गाठीशी अनेक आंदोलनांचा अनुभव असला तरी ‘आप’ पक्ष अजून प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुक आपल्यासाठी निश्चितच सोपी नसेल. वास्तवाचे भान नसणा-या आणि भ्रष्टाचारी राजकारण्यांमुळे आपल्यासारख्या नेत्यांना राजकारणात यावे लागते असे मेघा पाटकरांनी सांगितले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 8:09 am

Web Title: foray into politics very tough says medha patkar on fighting elections
Next Stories
1 बिहारच्या मंत्र्याकडून ‘माय नेम इज खान’चे प्रचारतंत्र!
2 काँग्रेस आणि भ्रष्टाचार एकाच नाण्याच्या दोन बाजू – नरेंद्र मोदी
3 अर्थमंत्र्यांचे मतानुदान!
Just Now!
X