आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायला कोण काय करेल ह्याचा नेम नाही. सॉरी म्हणणारे होर्डिंग्ज, फुलं आणि बरंच काही…मात्र ह्या पठ्ठ्याने तर वेगळ्याच अंदाजात आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायचा प्रयत्न केला आहे. ग्रेटर नोएडा भागातला एक आफ्रिकी तरुण आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढायला चक्क शोलेमधला वीरु झाला. काय केलं त्याने..चला जाणून घेऊ.

काल ग्रेटर नोएडा भागात एक तरुण आपल्या गर्लफ्रेंडची समजूत काढण्यासाठी एका अर्धवट बांधलेल्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर चढला आणि आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागला. हा शोले स्टाईल ड्रामा तब्बल दोन तास सुरु होता. आजूबाजूला बरीच गर्दीही जमा झाली होती. शेवटी पोलीस आणि या तरुणाच्या मित्रांनी त्याची समजूत काढली आणि त्याला खाली उतरवलं.

israel iran war history
Iran-Israel War: एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले?
Kevin Pietersen Shares Experience of flight while Iran Attacks Israel
IPL 2024: इराणच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत केविन पीटरसनची पोस्ट चर्चेत; अनुभव मांडताना म्हणाला, “त्यांची क्षेपणास्त्रं चुकवण्यासाठी…”
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
IPL, GT vs PBKS Preity Zinta Post For Shashank Singh
“IPL लिलावाच्या वेळी झालेल्या चुकीच्या..”, शशांक सिंगबाबत वादावर प्रीती झिंटाने सोडलं मौन, म्हणाली, “आजचाच..”

हेही वाचा- इन्स्टाग्रामवरच्या ‘या’ प्रसिद्ध जोडप्याच्या नावावरून त्याच्या फॅनने ठेवले स्वतःच्या मुलीचे नाव!

हा तरुण अंगाला देशाचा नागरिक आहे. त्याचं नाव एँटोनियो मुबाई असल्याची माहिती आजतकने दिली आहे. या तरुणाचं आपल्या गर्लफ्रेंडशी भांडण झालं होतं. तिची समजूत काढण्यासाठी तो या इमारतीच्या १२ व्या मजल्यावर चढून आत्महत्येची धमकी देत होता. हे सगळं पाहण्यासाठी बरीच गर्दी जमा झाली होती. आसपासच्या लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळवली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागले. मात्र, पोलिसांना भाषेची अडचण होऊ लागली. त्यांची भाषा या युवकाला समजत नव्हती. शेवटी पोलिसांनी त्याच्या काही मित्रांना त्याला समजावून सांगण्याची विनंती केली.

हा सगळा प्रकार दोन तास सुरु होता. पोलीस आणि या तरुणाचे मित्र वारंवार त्याला खाली येण्याची विनंती करत होते, समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तो कोणाचंही ऐकायला तयार नव्हता. पोलीस त्याला पकडायला जाताच तो इमारतीवर लटकायचा. शेवटी मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी त्याला सहीसलामत खाली उतरवलं.