भारतात लवकरच विदेशी लशी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. Pfizer आणि Moderna सारख्या परदेशी लस लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. भारताच्या औषध नियामक मंडळाने अशा लशीसाठी भारतात स्वतंत्र चाचण्या घेण्याची अट दूर केली आहे. ज्या लशी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मंजूर केल्या आहेत. त्या लशींची भारतात चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही.

एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे. Pfizer आणि Moderna लशीबाबत ‘indemnity against liability’ बाबत काही हरकत नाही. इतर देशांनी दिले तर आम्हीही तयार आहोत. या कंपन्यांनी भारतात ईयूए (इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन) साठी अर्ज केल्यास ते मंजूर करण्यास आम्ही तयार आहोत, असेही सूत्रांनी सांगितले. मागणी जास्त असल्याने या दोन्ही लसांना आतापर्यंतच्या परिस्थितीनुसार भारतात पोहोचण्यास वेळ लागेल, असेही या सुत्रानी सांगितले.

फायझर आणि मॉडर्ना ही परदेशी कंपन्यांपैकी आहेत जे सरकारशी नुकसान भरपाई आणि स्थानिक चाचण्यांमधून सूट मिळावी. तसेच दुष्परिणाम जाणवले तर स्थानिक कायदेशीर कारवाईतून सुट मिळवण्याचे कंपन्यांनी म्हटले होते. दरम्यान, सरकारने चाचणी न करण्याचे मान्य केले आहे.

 

ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाच्या पत्रात असे सांगितले गेले आहे की, ब्रिजिंग चाचण्या करण्याची अट काढून टाकण्यात आली आहे. आता जर परदेशी लस इतर कोणत्याही देशात किंवा कोणत्याही आरोग्य संस्थेने मंजूर केली असेल तर त्याची गुणवत्ता आणि स्थिरता भारतात तपासण्याची गरज भासणार नाही. हे करण्यासाठी, लसीकरणावरील नॅशनल एक्सपर्ट ग्रुपने शिफारस केली होती.

डीजीसीआयचे प्रमुख डॉ. व्ही.जी. सोमानी यांनी पत्रात म्हटले आहे की, ‘यूएस एफडीए, ईएमए, यूके एमएचआरए, पीएमडीएला जपानने मान्यता दिली आहे किंवा डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन वापराच्या यादीमध्ये समाविष्ट असलेली लस किंवा आधीपासून वापरलेली लस, ज्यातून लाखो लोकांचे लसीकरण झाले आहेत. अशा लशीची ब्रिजिंग चाचणी होणार नाही आणि ज्या देशाची लस आहे त्या देशाचा राष्ट्रीय नियंत्रण प्रयोगशाळेने प्रमाणित केले तर भारतात प्रत्येक बॅचची चाचणी घेण्याची गरज भासणार नाही.