15 August 2020

News Flash

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचा अल्प परिचय

केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचा अल्प परिचय

संग्रहित छायाचित्र

१) अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला.

२) त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव रतन प्रभा जेटली होते.

३) अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.

४) २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.

५) ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती.

६) १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.

७) १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून त्यांनी कॉमर्स विषयाची पदवी संपादन केली.

८) १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली.

९) सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्ते होते.

१०) १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.

११) १९८२ साली त्यांनी संगीता जेटली यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे.

१२) १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.

१३) जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले.

१४) जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.

१५) १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते.

१६) १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी ‘माहिती आणि प्रसारण’ राज्य मंत्रीपदी नियुक्ती झाली.

१७) मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

१८) मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.

१९) ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ नये.

२०) २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचं निधन झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 24, 2019 1:00 pm

Web Title: former union minister and senior bjp leader arun jaitly small information jud 87
Next Stories
1 ‘जेएनयू’मध्ये निवडणुकांचे वारे; 6 सप्टेंबर रोजी मतदान
2 माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचं निधन
3 छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाच्या चकमकीत पाच नक्षल्यांचा खात्मा
Just Now!
X