बेळगाव जिल्ह्य़ात एका खेडय़ामध्ये गोळ्यांच्या जखमा असलेला जो अज्ञात मृतदेह सापडला होता तो लेखक एम. एम. कलबुर्गी यांच्या मारेक ऱ्याचा नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. तो मृतदेह रूद्र पाटील याचा असल्याचा अंदाज आधी व्यक्त करण्यात आला होता.
तो मृतदेह चिकोडी तालुक्यातील कडापूर खेडय़ातील महंतेश चिदानंद शिरोळे याचा असून त्याला त्याच्या नंदकुमार व उदय या दोन भावांनी तसेच मंजुनाथ होसूर याने कौटुंबिक भांडणातून ठार केले होते, असे पोलीस उपमहानिरीक्षक हेमंत निंबाळकर यांनी सांगितले. महंतेश हा पुणे, कोल्हापूर व चिकोडी येथील अनेक गुन्ह्य़ात सामील होता. तिघांनी महंतेश याला सहलीचे आमिष दाखवून गोव्याला नेले व त्याला मारण्याचा कट रचला. नंदकुमार याने त्याच्या सहकाऱ्याकडून पिस्तूल खरेदी केले होते. हा मृतदेह माणिकवाडी येथे खानापूर व होंडे दरम्यान सापडला होता.