गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असतानाच बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा दिलासा दिला. बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

मुंबईत मंगळवारी पेट्रोल १० पैशांनी तर डिझेल ९ पैशांनी महागले होते. मुंबईत मंगळवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका होता. प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.

बुधवारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ केलेली नाही. मुंबईत बुधवारी पेट्रोलचा प्रति लिटर दर ८९ रुपये ५४ पैसे तर डिझेलचा प्रति लिटर दर ७८ रुपये ४२ पैसे इतका आहे. अन्य शहरांमधील पेट्रोल व डिझेलचे दरातही वाढ झालेली नाही. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ न झाल्याने दिलासा मिळाला आहे. दिल्ली, चेन्नई व कोलकाता या तीन महानगरांपेक्षा मुंबईत पेट्रोल- डिझेलचे दर सर्वाधिक आहे. मुंबईत पेट्रोल व डिझेलवर सर्वाधिक मूल्यवर्धित कर असल्याने जास्त पैसे मोजावे लागतात.