भूमिगत वाहिन्यांमधील गॅसच्या स्फोटात २४ जण ठार तर २७१ जण जखमी झाले. २८ लाख लोकसंख्या असलेले हे तैवानचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
गुरुवारी मध्यरात्री हे स्फोट झाले. स्फोटांचे नेमके कारण कळले नसले तरी, गॅसच्या वाहिन्यांमधून रासायनिक वायूची गळती झाली असावी अशी शक्यता आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या चार जवानांचा समावेश आहे. वायुगळतीची चौकशी सुरू आहे. किमान पाच स्फोटांनी शहर हादरले असे तैवानचे पंतप्रधान जियांग ये-हुच यांनी स्पष्ट केले. घटनास्थळी तातडीने बचावकार्य वेगात सुरू आहे. गॅस पूर्ण जळेपर्यंत बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचे मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक चिआंग जिया-जुच यांनी स्पष्ट केले. आगीमुळे मोठय़ा प्रमाणात धुराचे लोळ आकाशात दिसत होते.