आंध्र प्रदेशच्या अनंतपूरम जिल्ह्यातील एका खासगी स्टील कारखान्यात गुरुवारी विषारी वायू गळती झाली. या दुर्घटनेत सहा कामगारांचा मृत्यू झाला आहे. युनिटमधील मेंटेनन्सचे काम झाल्यानंतर चाचणी सुरु असताना ही दुर्घटना घडली अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक जी.अशोक कुमार यांनी वृत्तसंस्थेला दिली.

जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर चार जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. पाच कामगार जखमी झाले आहेत. कार्बन मोनोऑक्साइड या गॅसचा प्रक्रियेसाठी वापर केला जातो. पण हाच गॅस लीक झाल्याने दुर्घटना घडली असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

तडीपात्री येथे हा स्टीलचा कारखान आहेत. गेरदाऊ या ब्राझीलियन कंपनीकडे या स्टील कारखान्याची मालकी आहे. आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री एन. राजाप्पा यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.