03 March 2021

News Flash

अपहरण करुन मुलीची गोळी घालून हत्या, तीन दिवसांनी सापडला मृतदेह

एका निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह सापडला

प्रतिनिधिक छायाचित्र

पंजाबमधील अमृतसर येथून तीन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या १८ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी रात्री एका निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह सापडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. बुधवारी संध्याकाळी मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलगी ब्युटी सलूनमध्ये प्रशिक्षणासाठी जात असताना तिचं अपहरण करण्यात आलं होतं.

मुलीच्या कुटुंबाने त्याच दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलीची सुटका करण्यासाठी अपहरणकर्ते २० लाखांची मागणी करत असल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं होतं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, “तपासादरम्यान आम्हाला एका निर्जनस्थळी मुलीचा मृतदेह सापडला. गोळी घालून तिची हत्या करण्यात आली आहे”.

पोलीस निरीक्षक सुखविंदर सिंग रंधवा यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मुलीच्या एका वर्गमित्राला अटक करण्यात आली आहे. त्याची चौकशी केल्यानंतरच मृतदेह आमच्या हाती लागला”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 3:14 pm

Web Title: girl kidnapped and shot dead in punjab sgy 87
Next Stories
1 गो एअरच्या विमानात शिरलं कबुतर; प्रवाशांचा गोंधळ
2 मोदींविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या शिक्षकाला अटक, विद्यार्थ्यांनी दिली होती तक्रार
3 ‘मोदींनी जे गुजरातमध्ये केलं तेच दिल्लीतही दिसतंय;’ इम्रान खान यांची टीका
Just Now!
X