News Flash

‘त्याच्या’ दुष्कृत्यामुळे तिने स्वतःला पेटवून घेतले

उदयपूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत.

प्रतिकात्मक फोटो

राजस्थानमध्ये बुधवारी घडलेल्या एका घटनेत १८ वर्षांचा एक मुलगा २० वर्षांच्या मुलीस आंघोळ करताना लपून पाहात होता, जेव्हा मुलीला याबाबत कळले तेव्हा लाजेने ती एवढी व्यथित झाली की तिने स्वत:ला पेटवून घेतले. मुलीला वाचविण्यात यश आले असले तरी ती ७० टक्के भाजली असून, उदयपूरमधील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मुलाचे वडील आणि एका नातेवाईकाला पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या घरातील न्हाणीघरात आंघोळ करत होती. आपल्याला कोणीतरी न्याहाळत असल्याचा अचानक तिला संशय आला. तिने वळून पाहिले तर खरोखर एक मुलगा लपून तिला आंघोळ करताना पाहात होता. त्याला पाहाताच तिने आरडाओरड केली. तिचे ओरडणे ऐकून तिचे काका धावत तिथे आले. त्यांनी मुलाला पकडून सज्जड दम देत तेथून पळवून लावले.
नंतर मुलाच्या सांगण्यावरून मुलाचे वडील त्यांच्या एका ओळखीच्या इसमाबरोबर मुलीच्या घरी भांडणासाठी आले. भांडण वाढत चालल्याचे पाहून या सर्वाला आपणच जबाबदार असल्याची भावना मुलीच्या मनात निर्माण झाली. नंतर तिने घरात जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. तिचे ओरडणे ऐकून काकांनी घरात जाऊन तातडीने आग विझवली आणि तिला रुग्णालयात घेऊन गेले. त्यानंतर या प्रकरणाविषयी पोलिसांकडे तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना आणि नातेवाईकाला ताब्यात घेतले असून, मुलगा सध्या फरार आहे. पोलिसांनी मुलीचा जबाबदेखील नोंदवून घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2016 1:55 pm

Web Title: girl sets self on fire after seeing peeping tom
Next Stories
1 डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउंडेशनमधील सहकाऱ्याला अटक
2 आठवड्यात ‘आदर्श’ची इमारत ताब्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला आदेश
3 संसदेतील व्हिडिओमुळे भगवंत मान अडचणीत; कारवाईचे संकेत
Just Now!
X