06 March 2021

News Flash

‘ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा द्या’

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची पंतप्रधानांकडे मागणी

ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर पटनायक यांनी सांगितले की, मी पंतप्रधना मोदींना लोकसभा निवडणुकीत दुस-यांदा यश मिळवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांच्याकडे ओदिशाला विशेष राज्याचा दर्जा दिला जावा अशी मागणी देखील केली आहे. कारण, अशातच आम्ही एका भयंकर चक्रीवादळाचा तडाख सहन केला आहे. ज्याने आमच्या राज्याचे मोठ्याप्रमाणात नुकसान केले आहे.

मुख्यमंत्री पटनायक हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची देखील भेट घेणार आहेत. याशिवाय त्यांचा १५ जून रोजी होणा-या नीती आयोगाच्या संचलान परिषदेच्या पाचव्या बैठकीत सहभागी होण्याचे देखील नियोजन आहे. दिल्लीत आपल्या दौ-या दरम्यान ते अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत, प्रधानमंत्री किसान योजना अशा योजनांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2019 12:00 pm

Web Title: give special category status for odisha cm patnaik msr 87
Next Stories
1 पत्रकाराची ताबडतोब मुक्तता करा; कोर्टाने योगी सरकारला फटकारले
2 चांद्रयान-२ मोहिमेची तारीख ठरली; जुलैमध्ये घेणार चंद्राच्या दिशेने झेप
3 काँग्रेसला मिळणार हंगामी अध्यक्ष ?
Just Now!
X