गोवा पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केरून उझबेकिस्तानच्या तीन तर भारताच्या २ मुलींची सुटका केली आहे. तर या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.  या दोघांवर विविध कलमांद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची चौकशी सुरु आहे. कलंगुट भागात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी जाऊन छापा मारला. या छाप्यात पाच मुलींची सुटका करण्यात आली, तर दोघांना अटक करण्यात आली.

या आधी डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारे गोव्यात सेक्स रॅकेट उघड झाले होते. त्यावेळीही कलंगुट भागातच सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. ज्यानंतर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. दोन दलाल हे सेक्स रॅकेट चालवत होती. त्यावेळच्या कारवाईत पोलिसांनी सात मोबाइल आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. तर दोन मुलींची सुटकाही करण्यात आली होती.

गोवा हे सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथील समुद्र किनारे हे पर्यटकांनी गजबजलेले असतात. वर्षाचे बाराही महिने या ठिकाणी ‘सुशेगात’ अर्थात पिकनिकचाच माहोल असतो. अशात या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून सेक्स रॅकेटच्या घटनाही उघडकीस येत आहेत. डिसेंबरनंतर आता एप्रिल महिन्यातही पोलिसांनी छापा मारून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.