करोना आणि त्यावरून लागू करण्यात आलेल्या लॉगडाउनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. आता करोनाची लाट ओसरत आहे, तसे निर्बंध शिथिल केले जात आहेत. शक्य तिथे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. मात्र आता गुगल कर्मचाऱ्यासाठी वाईट बातमी आहे. आता वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली जाण्याची शक्यता आहे. गुगलने आपल्या कर्मचाऱ्यांना घर आणि कार्यालयातून काम करताना पगारामधील फरक जाणून घेण्यास सांगितले आहे. कर्मचारी स्वत: साठी या फरकाची गणना करण्यास मोकळे आहेत आणि त्यांना त्या आधारावर निर्णय घ्यावा लागेल. ज्यांचे घर ऑफिसपासून खूप दूर आहे, असे लोक जे लांबचा प्रवास करून ऑफिसमध्ये येतात, त्यांचा पगार कापला जाऊ शकतो. फेसबुक आणि ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात अशीच कपात केली आहे. कमी खर्चाच्या ठिकाणी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रमोशन मिळालेल्या कर्मचाऱ्यांचा पगारही कापला जाऊ शकतो.

गुगल कर्मचारी वर्क फ्रॉम होमचं पर्याय निवडत असतील, तर त्यांच्या पगारात मोठा फरक जाणवण्याची शक्यता आहे. वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसमधून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकेतील सिलिकॉल व्हॅलीत वेगवेगळे प्रयोग केले जात आहे. पगारातील भत्ता हा पूर्णपणे राहण्याच्या ठिकाणावर अवलंबून आहे. यामध्ये स्थानिक बाजारपेठेतील कर्मचारी, ज्यांचे घर कार्यालयाजवळ आहे, अशा लोकांना अधिक सुविधा दिल्या जातात. पगाराची तफावत शहारानुसार वेगवेगळी असणार आहे.

गुगलने यावर्षी जूनमध्ये वर्क लोकेशन टूल लाँच केलं आहे. या टूलच्या माध्यमातून वर्क फ्रॉम होम आणि कार्यालयात केलेल्या कामाची माहिती घेतली जाते. त्यामुळे ज्यांचं घर ऑफिसपासून लांब आहे, अशांचा पगार कापला जाणार आहे. गुगलचे कर्मचारी टूल लाँच झाल्यापासून कार्यालयातून काम करण्यास प्राधान्य देत आहेत. यामुळे त्यांची पगार कपात वाचणार आहे.

मुंबईसह भारतातली १२ शहरं तीन फूट पाण्यात जाणार?; समुद्राची पातळी वाढण्याचं संकट

गुगलने सुरुवातील वर्क फ्रॉम होम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार दिला आहे. आता या निर्णयामुळे कंपनीच्या पे स्ट्रक्चरवर परिणाम दिसू शकतो. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पर्याय निवडून कामाची आखणी करावी लागणार आहे.